बोरगावच्या हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये वाघांची शाकाहारी जत्राउत्सव

सातारा – सातारा शहरापासून 12 कि. मी. अंतरावर असणाऱ्या बोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये खास श्रावण उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीच्या विविध शाकाहारी पदार्थांची मेजवानी तसेच पंजाबी डिशेस यांची सरबराई करण्यात येणार आहे.

यामध्ये सातारी पद्धतीचे गाठीचे पिठले, काळ्या चटणीतील आख्खा मसूर, चमचमीत मटकीची आमटी, हिरव्या मिरचीचा खर्डा, ज्वारीची, बाजरीची, तांदळाची व नाचणीची भाकरी, घरगुती मेथीची भाजी सोबत तेल, चटणी, वांग्याचं भरीत, भरलं वांगं, मसालेदार भेंडी, इंद्रायणी गिजगा भात यासारख्या विविध लज्जतदार, शाकाहारी पदार्थांची चव सातारा जिल्हा परिसरातील खवैय्यांना चाखायला मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचबरोबर पंजाबी डिशेसमध्ये महाराजा स्पेशल पनीर, टिक्‍का मसाला, महाराजा स्पेशल पनीर टिक्‍का मसाला, महाराजा स्पेशल काजू करी, ग्रीन पीस मसाला, मिक्‍स व्हेज, व्हेज मराठा, व्हेज कोल्हापुरी यासारख्या पंजाबी डिशेस व सोबत तंदूर रोटी, नान, पराठा, कुलचा यांची जोड लाभणार आहे. त्याचपद्धतीने उपवासासाठी शाबुदाणा खिचडी, शाबू वडा, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी यांचीही उपलब्धता करण्यात आली आहे.

घरच्यासारख्या जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल महाराजा पॅलेसने उत्कृष्ठ दर्जाची धान्य, भाजीपाला, तेल वापरुन शुद्ध, पौष्ठिक व सात्विक पदार्थ देवून, उत्कृष्ठ दर्जाची सेवा, स्वच्छता ठेवल्याने ग्राहकांनी याला खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. याचे सातत्य टिकवण्यासाठी व ग्राहकांशी कायमची नाळ जोडण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले आहे. तरी या उत्सवास आवर्जुन भेट देण्याचे आवाहन हॉटेल महाराजा पॅलेसतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)