बोटांचे ठसे जुळत नाही; धान्य मिळणार नाही

भवानीनगर- भवानीनगर, अशोकनगर, भाग्यनगर, संजयनगर व गायकवाडवस्ती येथील काही नागरिकांना त्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे मशीनवर जुळत नसल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्यास येथील कामगार कन्झुमर्स सोसायटीने नकार दिल्याने नागरिकांनी दुकानदाराकडे जाब विचारात तक्रार मांडली. त्यानंतर माजी सरपंच राहुल काळे, सदस्य गजानन मोरे, यशवंत नरुटे, मुरली चव्हाण, अजित सोनवणे व नानासाहेब निंबाळकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी ठसे जुळवण्या प्रक्रियेला 4 मे पर्यंत मुदतवाढ दिल्याने नागरिकांना स्वस्त धान्य वाटप करण्यात आले.
या भागातील सर्व कुटुंब हे मोलमजुरी करून उपजीविका करीत असल्याने या स्वस्त धान्य दुकानातून धान्य नेहण्यासाठी रोज हेलपाटे घालणे कठीण होत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे खाडे झाल्याने त्यांना कुटुंबाची रोजची उपजीविका करणे कठीण होत आहे. येथील भागातील ऐकून 840 शिधाधारक आहेत. आज (सोमवारी) यापैकी 221 नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळाले उरलेल्या नागरिकांना देण्यात आले नाही. त्यावेळी नागरिकांनी का मिळत नाही आसा संतप्त सवाल करत तक्रार केली. त्यावेळी कामगार कन्झ्युमर्स सोसायटीच्या धान्य वाटप विभागाकडून सांगण्यात आले की, शासनाने जी मशीन दिली आहे, त्या मशीनवर काही नागरिकांच्या हाताच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत म्हणजेच लिंक होत नाहीत. त्यात आमचा काहीएक दोष नाही. शासनानेच सांगितले आहे की, ज्यांचे हाताच्या बोटांचे ठसे लिंक होतील त्यांनाच स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्यात येईल; परंतु एका व्यक्तीचे 8 ते 10 वेळा हाताच्या बोटांचे ठसे लिंक केले तरीही मशीन लिंक झालेले दाखवत नाही. जर लिंक न होता स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिले तर शासन त्या त्या दुकानदारांवर कारवाई करीत आहे. व नागरिकांना नाही दिले तर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नक्की दुकानदारांनी कशा पद्धतीने निर्णय घ्यावा तोच सध्या प्रश्न पडलेला आहे. शासनाकडून स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी दर महिन्याच्या 7 तारखेलाच माल येत आहे मात्र, नागरिकांचे मशीनला हाताच्या बोटांचे ठसे लिंक होत नाहीत त्यामुळे दुकानात माल शिल्लक राहत आहे. यावर शासनाने काहीतरी उपाय काढावा की ज्यामुळे नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून वेळेत धान्य देण्यात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)