बॉलीवूडमध्ये येण्याआगोदरच ट्रोल

बॉलीवूडमध्ये सध्या अनेक स्टार किड्‌स यायला लागले आहेत. यामध्ये बॉलीवूडमधीलच नव्हे तर टीव्ही एन्टरटेनमेंट विश्‍वातील कलाकारांचीही मुले पदार्पण करायला लागली आहेत. श्‍वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल व्हायला लागल्याने तिचा फॅन क्‍लबही मोठा वाढायला लागला आहे.

तिच्या अनेक फोटोंना नेटिझन्सकडून खूप “लाईक’ मिळायला लागले आहेत. नुकतेच पलकने इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिचे ओठ जरा जास्तच मोठे दिसत होते. त्यावरून नेटिझन्सनी ही ट्रोलबाजी सुरू केली होती.

‘ओठ मोठे दिसावेत, म्हणून पलकने लीप सर्जरी केलेली दिसते.’ अशी पहिली कॉमेंट पडली. त्यानंतर तिच्यावर टीका करणारे अनेक कॉमेंट पडायला लागले. या फोटोंमध्ये पलक फारच खराब दिसते आहे, असे अनेकांनी तिला सुनावले. एकाने तर तिला “मोमोजवाली लडकी’ म्हटले. तर दुसऱ्याने “चिमणी’ म्हटले, “हा फोटो तुझा आतापर्यंतचा सर्वात वाईट फोटो आहे.’ असे सरळ सरळ सांगून तिचे खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न झाला. यावरकडी म्हणजे तिच्या ओठांना “बोटोक्‍स लीप्स’ म्हटले.

आता मात्र पलकची सहनशीलता संपली. तिने खरमरीत उत्तर दिलेच. “मी केवळ 17 वर्षांची आहे. स्वतःला बदलण्यासाठी औषधे घेण्याची मला आवश्‍यकता नाही. लोकांना आवडो वा ना आवडो, असे आरोप करण्याचा एक ट्रेंड बनायला लागला आहे. मी हे आरोप ऐकण्यासाठी तयार नाही.’ एवढे ऐकवल्यावर तिने नेटिझन्सना चक्‍क “गुड नाईट, बेस्ट विशेश’ असे म्हणूनही टाकले.

पलकने इतक्‍या सडेतोडपणे दिलेले उत्तर मात्र काही नेटिझन्सना खूप आवडले. तिच्या या उत्तरावरून हे लक्षात येते की पलक आपल्या आईसारखी म्हणजे श्‍वेता तिवारीसारखीच बोल्ड आणि फिल्म इंडस्ट्रीतल्या उतार चढावांना सामोरी जायला तयार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)