बॉलिवूडमध्ये कोणीही मैत्रीण नाही- काजोल

काजोल सध्या “हेलिकॉप्टर ईला’या आपल्या होम प्रॉडक्‍शन सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यात बिझी असल्याने तिला सध्या फार थोडा निवांत वेळ मिळतो आहे. नाहीतर एरवी असा निवांत वेळ कसा घालवायचा, याचा तिला प्रश्‍न पडलेला असतो.

बॉलिवूडमध्ये तिला जवळचे मित्र-मैत्रिणी नाहीत. जे काही थोडे मित्र-मैत्रिणी आहेत. ते आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात. असाच एक जवळचा मित्र करण जोहर होता. पण त्याच्याहीही काजोलचे काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. काही महिने ते दोघेही एकमेकांपासून दूरच राहिले होते. मात्र, आता हे भांडण मिटले आहे, असे काजोलने सांगितले. दोघेही आता पुन्हा पूर्वीसारखेच मित्र झाले आहेत. मित्रांमध्ये थोडे मतभेद व्हायलाच पाहिजेत. भांडणे झाली तरी मैत्री कायम ठेवतात, तेच खरे मित्र असतात. करण जोहर अशांपैकीच आहे. काजोल कोणत्याही मित्र किंवा मैत्रिणीबरोबर फार सोशल असत नाही. फिल्म इंडस्ट्रीतील कोणत्याही अभिनेत्रीनेही काजोलबरोबरची दोस्ती टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. बॉलिवूडमध्ये कायमचे दोस्त कोणीच असत नाही. जे कोणी असतात ते कामाच्या निमित्ताने भेटणारे असतात. काम संपले की त्या ओळखी मागे पडतात. अशाच काही जणांना काजोल खूप मानते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मैत्रिणींच्या बाबतीत बोलायचे तर काजोलला बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे काम खूप आवडते. त्यापैकी विद्या ही तिची फेव्हरेट अभिनेत्री आहे. विद्या खूप छान आणि विनोदी स्वभावाची आहे. याशिवाय अलिया, कृती सेनन, जॅकलीन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन देखील तिला खूप छान वाटतात. पण या सगळ्यांबरोबर मैत्री करण्याऐवजी हे सगळे आपल्याला घाबरतात, असे तिला वाटते. थोडेसे तसे असलेही पाहिजे. कारण काजोल या सगळ्यांना सिनिअर आहे. तिच्या समवयस्कांमध्ये तिला फारच थोडे मित्र आहेत. त्यातही तिच्या फ्रेंड लीस्टमध्ये अभिनेत्रींची नावे फारच कमी किंवा अगदी नगण्य आहेत. त्यातही एखाद्या खास अभिनेत्रीला आपली खास मैत्रीण म्हणता येऊ शकेल, अशीही काही शक्‍यता नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)