“बॉम्बे’ नव्हे “मुंबई’…

बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे नांमातर


मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई – मुंबईतील नांमाकित बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे नांमातर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार या महाविद्यालयाच्या नावातील “बॉम्बे’ हे नाव काढून टाकण्यात येणार असून ते आता मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय या नावाने ओळखले जाणार आहे.

केंद्र शासनाने 15 डिसेंबर 1995 मध्ये इंग्रजीतील बॉम्बे आणि हिंदीमधील बम्बई या शब्दांऐवजी सर्व भाषेत मुंबई असेच लिहिण्यात यावे, असा निर्णय घेतला. त्यावेळी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या या महाविद्यालयाच्या नावाबाबत विचार करण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समितीने बॉम्बे नावाने महाविद्यालय ओळखले जात असल्याने इंग्रजीमध्ये Bombay Veterinary college, Parel, Mumbai असे तर मराठीत पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ, मुंबई असे करण्यात यावा असा निर्णय घेतला. त्यानंतर 1 एप्रिल 2001 पासून शासनाने निर्माण केलेल्या नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत हे महाविद्यालय कार्यरत झाल्यानंतर विद्यापीठाने ‘बॉम्बे’ पशुवैद्यकीय महाविद्यालयाला ‘मुंबई’ पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई असे नाव देण्याचा ठराव मंजूर केला.

राज्य शासनाच्या विधि व न्याय विभागाच्या 1996 च्या अधिनियमानुसार महाविद्यालयाच्या नाव बदलाचा विद्यापीठाचा ठराव मंत्रिमंडळापुढे सादर करणे आवश्‍यक होते. त्यानुसार या महाविद्यालयाचे नाव बदलण्यासंदर्भातील विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)