बैठकीचे व्हिडियो रेकॉर्डिंग केल्याने मोदी संतप्त

नवी दिल्ली – एका महत्त्वाच्या बैठकीचा व्हिडियो रेकॉर्डिंग करणाऱ्या महिला खासदारावर पंतप्रधान मोदी संतप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अलीकडेच लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व भाजपा खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात असलेल्या या बैठकीला सुमारे 250 खासदार उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी व्यासपीठावर होते. बैठक चालू असताना पंतप्रधानांची नजर उत्तर प्रदेशातील बाराबंकीच्या खासदार प्रियंका रावत यांच्याकडे गेली. त्या आपल्या मोबाईलवर बैठकीचे व्हिडियो रेकॉर्डिंग करत होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांच्या या कृतीने संतप्त पंतप्रधानांनी प्रियंका रावत यांना ताबडतोब व्हिडियो रेकॉर्डिंग बंद करून मोबाईल स्विच ऑफ करण्यास सांगितले. इतकेच नाही, तर त्यांनी केलेले व्हिडियो रेकॉर्डिग डीलिट केले आहे की नाही, याची खातरजमा करण्याची जबाबदारी त्यांनी कार्यकरिणीच्या एका सदस्यावर सोपवली.
खासदार प्रियंका रावत आणि विवाद यांचे नाते जुनेच आहे.

एका आयएएस अधिकाऱ्याला धमकावण्यावरून पूर्वी त्या चर्चेत आल्या होत्या. माझ्या कार्यकर्त्यांना काही अडचण आली तर तुला जगणे हराम करून टाकीन अशी धमकी देणाऱ्या प्रियंका रावत यांचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)