बेल्हे परीक्षा केंद्रात बाराचीवी परीक्षा सुरू

244 विद्यार्थी, तर 276 विद्यार्थिनींचा समावेश

बेल्हे- बेल्हे (ता. जुन्नर) येथील श्री बेल्हेश्वर विद्यालयात गतवर्षी नव्यानेच सुरू झालेल्या परीक्षा केंद्रात एचएससी बोर्डाच्या परीक्षेला आज (दि. 21) पासून सुरुवात झाली.
बेल्हे येथील श्री बेल्हेश्वर विद्यालयात नव्याने सुरू झालेल्या परीक्षा केंद्रात 470 विद्यार्थी यंदाच्या परीक्षेला बसले आहेत. यात 244 विद्यार्थी, तर 276 विद्यार्थिनींचा समावेश आहे.
यात बेल्हेश्वर विद्यालयाचे 170, आणे येथील सरदार पटेल हायस्कूल व श्री रंगदास स्वामी उच्च माध्यमिक विद्यालयाचे,समर्थ ज्युनिअर कॉलेजचे आणि आळेफाटा येथील हांडे-देशमुख हायटेक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी 300 परीक्षेला बसले आहेत. बेल्हे परीक्षा केंद्रावर ही परीक्षा कडेकोट बंदोबस्तात पार पडणार असल्याचे केंद्रप्रमुख प्राचार्य बाळासाहेब पाटोळे यांनी सांगितले.
नव्याने सुरू झालेल्या परीक्षा केंद्राला स्थानिक स्कुल समितीचे अध्यक्ष रामभाऊ बोरचटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गाडगे, उपसरपंच नीलेश पिंगट, सुरेश भूजबळ, जानकू डावखर यांनी भेट देऊन परीक्षा केंद्रात आलेल्या परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.