बेरोजगारांच्या असंतोषावर ट्रम्प, मोदींनी केला स्वार होंण्याचा प्रयत्न: राहुल गांधी

लंडन: डोनाल्ड ट्रम्प किंवा नरेंद्र मोदी यांच्या सारख्या नेत्यांनी बेरोजगारांमधील असंतोषावर स्वार होऊन त्यांच्या असंतोषांचा राजकीय लाभ घेत या नेत्यांनी लोकप्रिता मिळवली पण त्यांच्या समस्या सोडवण्यात या नेत्यांना अपयशच आले. उलट त्यांनी देशाचे नुकसानच केले असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. भारतीय पत्रकारांच्या संघटनेशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

ज्यांच्याकडे नोकऱ्या नाहींत अशा असंतोषी लोकांनी हे नेतृत्व उचलून धरले. पण या नेत्यांनी बेरोजगारांचे प्रश्‍न सोडवलेच नाहींत उलट त्यांनी देशाचेच नुकसान करण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की भारतात बेरोजगारी ही एक गंभीर समस्या बनली आहे पण सरकारने ही समस्या असल्याचे मान्य करण्यासच नकार दिला आहे. भारतात एकच विचारसरणी लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही विचारसरणी नागपुरातून पसरवली जात आहे. त्यातून सत्तेचे एकीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना पुन्हा मुस्लिम ब्रदरहुड या दहशतवादी संघटनेशी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुस्लिम ब्रदरहुड ही अरब जगतातील खूप जुनी इस्लामिक कट्टरतावादी संघटना आहे. तेथील सरकारांनी त्या संघटनेवर बंदी घातली असून ही संघटना दहशतवादी संघटना असल्याचे घोषित केले आहे. संघ आणि मुस्लिम ब्रदरहुड या दोन्ही संघटना 1920 मध्येच स्थापन झाल्या आहेत. दोन्ही संघटनांचा संस्थांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यांच्या कारवायांमुळे या संघटनांवर बंदीची कुऱ्हाड कोसळते. संघावरही महत्मा गांधी यांच्या हत्येनंतर बंदीची कुऱ्हाड कोसळली होती असे दोन्ही मधील काहीं समान गुण त्यांनी निदर्शनाला आणून दिले. विजय मल्ल्यांच्या संबंधातील वादावर बोलताना त्यांनी मिष्कली टिपण्णी केली. ते म्हणाले की मल्ल्या यांच्या सारख्यांसाठी भारतीय कारागृहे अगदी योग्य आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)