बेपत्ता जोतिराम कदम यांचा खून

पाडळीनजिक धोम कालव्यात आढळला मृतदेह

कोरेगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – मुगाव फाट्यावरील हॉटेल अलंकारचे मालक जोतिराम महादेव कदम हे तीन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरू असतानाच मुगाव फाट्यानजिक त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांचा धारधार शस्त्राने खून झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत माहिती अशी, जायगाव, ता. कोरेगाव येथील जोतिराम महादेव कदम वय 42 यांचे मुगाव फाट्यावर अलंकार हे हॉटेल होते. दि. 27 रोजी सकाळी पत्नीला सातारा बसस्थानकावर सोडून पुण्याला गेले होते. त्याच रात्री सव्वा बारा वाजता त्यांनी फोन करून अलंकार हॉटेलवर आलो असून घरी येत असल्याचे सांगितले होते. मात्र, ते घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कुटुंबीय तसेच पोलिस त्यांचा शोध घेत असताना त्यांची दुचाकी भिमनगर-जळगाव रस्त्यावरील पुलाच्या कडेला आढळून आली. बेवारस दुचाकी आढळल्याची खबर स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दुचाकीची पाहणी केली असता त्यावर रक्ताचे डाग आढळून आले. दरम्यान, पाडळी गावच्या हद्दीत मुगाआबा वस्तीजवळ धोम कॅनॉलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी सुभाष महादेव कदम यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीने जोतिराम यांचा तिक्ष्ण हत्यारांनी डोक्‍यात वार करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)