बेपत्ता आयटी अभियंता तरुणीचा मृतदेह 300 फूट दरीत सापडला

लोणावळा – दीड वर्षांपूर्वी हैदराबादहून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या एका 24 वर्षीय अभियंता तरुणीचा सुमारे 300 फूट खोल दरीत मृतदेह सापडला. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर लायन्स पॉईंटच्या दरीमध्ये रविवारी तिचा मृतदेह आढळला.

आलिजा राणा (वय 24, रा. हिंजवडी, मूळ हैदराबाद) असे तरुणीचे नाव आहे. ती इन्फोसिस कंपनीमध्ये आयटी अभियंता होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिजा राणा ही गुरुवारपासून (दि. 12) बेपत्ता होती. लायन्स पॉईंट परिसरात एका डोंगर कड्यावर आलिजाची बॅग सापडली होती. त्यामुळे शुक्रवारी (दि. 13) शिवदूर्गच्या टीमने दरीत शोधमोहीम सुरू केली. शनिवारी येथे पावसाचा जोर वाढल्याने दाट धुके वाढले. धुक्‍यामुळे शोधकार्याला अडथळा आला आणि शोधकार्य थांबले. मात्र, रविवारी पुन्हा दरीत उतरून शोध सुरू केला असता तिचा मृतदेह 300 फूट खोल दरीत आढळून आला. या युवतीच्या मृत्यूचे कारण काय आहे, याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.