बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्यास परिणामांची तयारी ठेवावी: ट्रम्प 

ब्रिजवॉटर: अमेरिकेच्या सीमा बेकायदेशीरपणे ओलांडल्यास त्याचे परिणाम संबंधितांना भोगायला लागतील, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. घुसखोरी करणारे लोक आपल्या दुष्ट हेतूंसाठी आपल्या मुलांचा वापर करत आहेत, असेही ट्रम्प ट्‌विटरवर म्हणाले.
अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे शिरकाव करणाऱ्यांच्या मुलांना मेक्‍सिकोच्या सीमेवर त्यांच्या पालकांपासून वेगळे केले गेले होते. अशा मुलांना न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभुमीवर ट्रम्प यांनी हे ट्‌विट केले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)