बेंदूर सणावर मराठा मोर्चाचे सावट

कवठे, दि. 25 (प्रतिनिधी) –
बेंदूर म्हणजे शेतकरी राजाचा व त्याला साथ देणाऱ्या बैलांच्या हक्काचा व लाड कौतुक पुरवण्याचा सन. प्रत्येक वर्षी शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांची थाटामाटात मिरवणूक काढीत असतात. दिवसेंदिवस शेतीमध्येसुद्धा आधुनिकतेच्या नावाखाली शेती अवजारांचे यांत्रिकीकरण झाले असून बैलांची जागा आता छोट्या व मध्यम आकाराच्या ट्रॅकटरने घेतल्याने खेडोपाडी प्रत्येक घराच्या दावणीला असलेल्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही परंपरागत शेती करणारे शेतकरी यांत्रिक शेतीला बगल देत पुरातन पद्धतीने बैलांचाच वापर शेतीसाठी करीत असून आजच्या बेंदूर या सणादिवशी या बैलांचे कोडकौतुक शेतकरी पुरवीत असतो.
वाई तालुक्‍यातील किंबहुना सातारा जिल्ह्यातील सर्वत्रच ग्रामीण पातळीवर हा सण साजरा केला जातो, कारण मुळाचा सण असे या सणाला म्हटले जाते. या सणापासून सणांची सुरुवात होत असली तरी यंदाच्या मराठा क्रांती मोर्चाच्या काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीमुळे सर्वत्रच शेतकरी वर्गामध्ये दुःखाचील लाट पसरली आहे. विशेषत: मराठा व मराठेतर शेतकरी बांधवानी या घटनेचा निषेध म्हणून काही ठिकाणी बेंदूर सण सध्या पद्धतीने साजरा केला तर मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देण्यासाठी व काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली म्हणून बऱ्याच गावातून आजच्या बैल मिरवणुका रद्द करण्यात आल्या. आपलाच एक बांधव शहीद झाल्याने मुळाचा सण असलेला बेंदूर साजरा न करण्याचा निर्णय ग्रामीण भागातून झाल्याचे चित्र दिसून येत होते तर ज्या गावातून मिरवणुका झाल्या त्याही सर्वच मिरवणुकांच्यामधून बैलांच्यावर मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा दर्शविणारे संदेश बैलांच्या अंगावर शेतकरी वर्गाने रेखाटले होते. त्यातून मराठा क्रांती मोर्चास असलेला पाठींबा व शेतकरी बांधवांची मोर्चास असलेली साथ दर्शविली जात होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)