बेंदुर उत्साहात पण, ट्रॅक्‍टर मिरवणुकीने

वाठारस्टेशन ः बेंदूर सणादिवशी ट्रॅक्टरची काढलेली मिरवणूक.

वाठार स्टेशन, दि. 26 (प्रतिनिधी) – बेंदुर हा सण जरी बैलांचा असला तरी आधुनिक काळामुळे बैलशेती लोप पावत चालली आहे. बैलांची जागा आता ट्रॅक्‍टरने घेतली आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या बेंदुर या सणातील बैलांची संख्या घटताना दिसत असतानाच ट्रॅक्‍टरची संख्या वाढत आहे. बुधवारी साजऱ्या झालेल्या बेंदुर सणादिवशी वाठार स्टेशन व परिसरात ट्रॅक्‍टर मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत ट्रॅक्‍टरची संख्याही मोठी होती.
बळीराजाला शेतीच्या सर्व कामांमध्ये बैलांची मोठी मदत होत असते. बैल आणि शेतकरी यांचे एक अनोखे असे नाते असते. ते नाते आणखी दृढ व्हावे या हेतुनेच कदाचित पूर्वीपासून बेंदुर हा सण साजरा होत आहे. बेंदुर या सणादिवशी बळीराजा बैलांना अगदी स्वच्छ धुवून त्यांना विविध रंगांनी रगवित असतो. तसेच रंगीबेरंगी वस्त्रांची झुल त्याच्या पाठीवर टाकून त्याचे देखणेपण आणखी आकीवरेखीव करत असतो. मात्र, आधुनिकतेच्या प्रवाहात आता बैलांची संख्या कमी होऊ लागली आणि बेंदुर या सणातील बैलांची जागा ट्रॅक्‍टरने घेतली. बैलांऐवजी बळीराजा आता ट्रॅक्‍टर सजवून ट्रॅक्‍टरचीच मिरवणूक काढू लागला आहे. गावागावातील बैलांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नुकताच बुधवारी पार पडलेल्या बेंदुर या सणादिवशी गावागावातून बैलांऐवजी ट्रॅक्‍टरच्या मिरवणुका निघाल्या. वाठार स्टेशनसह परिसरातील बुधवारी ट्रॅक्‍टरची भव्य मिरवणुक काढली होती. यावेळी ट्रॅक्‍टरला रंगीबेरंगी रेबीन तसेच फुगे लावून सजविण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)