बॅंक फसवणूक प्रकरणात गुजरातमधील कंपनीची 1122 कोटींची मालमत्ता जप्त

2654 कोटी रूपयांचा आणखी एक बॅंक घोटाळा उघड
नवी दिल्ली – सक्त वसुली विभागाने गुजरात मधील डीपीआयएल कंपनीची सुमारे 1122 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मनि लॉंडरिंग आणि बॅंक फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. डायमंड पॉवर इन्फ्रास्टक्‍चर लिमीटेड असे या कंपनीचे नाव असून त्यांनी विविध बॅंकांची एकूण 2654 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि तपासाची प्रक्रिया गेल्या महिन्यापासून सुरू होती.

या कंपनीच्या अनेक उपकंपन्याही असून त्यांच्यावरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये जमीनी, इमारती, विंडमिल, प्लांट व तेथील मशिनरी, कंपनीच्या नावावरील सदनिका, आणि कंपनीने अन्यत्र केलेल्या गुंतवणुकीचा समावेश आहे. या कंपनीने नीरव मोदींप्रमाणेच बॅंकांमधील लेटर ऑफ क्रेडीटचा दुरूपयोग करून ही फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. त्यांनी त्यांच्याकडील पैसे मोठ्या प्रमाणात विदेशी खात्यांमध्ये जमा केल्या असल्याचेही आढळून आले आहे.

या कंपनीने बॅंकांना खोटे हिशोब व कागदपत्रे सादर करून विविध बॅंकांकडून तब्बल 2654 कोटींचे कर्ज घेतले आहे आणि ते कर्ज त्यांनी बुडवले आहे. एस. एन भटनागर आणि त्यांचे पुत्र अमित भटनागर अशी या कंपनीच्या मालकांची नावे आहेत. सन 2008 पासून जून 2016 या अवधीत त्यांनी एकूण 11 बॅंकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या डिफॉल्टर्सच्या यादीत या कंपनीचे नाव असूनही बॅंकांनी त्यांना वेळोवेळी मोठ्या रक्‍कमांची कर्जे दिली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)