बॅंक फसवणूक प्रकरणातील तिघांना जामीन

एकास कोठडी : पिंपरी सेंट्रल बॅंक शाखेतील प्रकार

पिंपरी – पिंपरी येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मंजूर करुन हजारो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅंकेचा शाखा व्यवस्थापक याच्यासह तिघांना “सीबीआय’ कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी धीरज चचलानी याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पिंपरी येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून 2010-2012 या वर्षात बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांचे कर्ज प्रकरणे मंजूर करुन घेतली आहे. त्या कर्जाची परतफेड न करता बॅंकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी धीरज चचलानी आणि राकेश सिंग यांच्यासह राकेश जैस्वाल, रवी भूषण प्रसाद व नंदकिशोर खैरनार यांच्यावर आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.

यावर सीबीआय कोर्टाने बॅंकेतील अधिकारी राकेश जैस्वाल, रवी भूषण प्रसाद आणि नंदकिशोर खैरनार यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावतीने ऍडव्होकेट अंकूश गोयल यांनी न्यायालयात बाजू मांडली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)