बॅंकांमुळे सर्वसमावेशक विकास शक्‍य

विकासदराबरोबरच स्थूल अर्थव्यवस्था बळकट असावी

नादारी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे कर्जवसुली वाढण्याची शक्‍यता

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई: जन-धन योजना, मुद्रा योजना आणि अल्प दरातल्या विमा योजनांमुळे बॅंकिंग क्षेत्र घरोघरी पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसमावेशक विकासाला चालना मिळाली असल्याचे केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री अरुण जेटली यानी सांगितले.

बॅंकिंग व्यवस्था या कुठल्याही अर्थव्यवस्थेचा आत्मा असतात असे सांगत राष्ट्रबांधणी विशेषत: उद्योगांना पाठबळ देण्यात बॅंकिंग क्षेत्राचे कार्य अजोड असल्याचे जेटली म्हणाले.
पुढच्या वर्षात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, जेटली यांनी व्यक्त केली. मुंबईत आज भारतीय बॅंक संघटनेच्या 71 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

भारतात सध्या अर्थव्यवस्थेत जे बदल होत आहेत त्यात बॅंकिंग उद्योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, यासाठी बॅंकिंग व्यवस्थेत व्यावसायिकता विश्वासार्हता आणि बॅंकिंग क्षेत्राचा विस्तार अधिकाधिक होणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले. या सभेच्या निमित्ताने बॅंकिंग क्षेत्राने आत्मपरीक्षण करून दीर्घकालीन विकासासाठी आराखडा तयार करण्याची गरज आहे, असे जेटली यावेळी म्हणाले.

उच्च विकासदर गाठताना त्याची सांगड अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संरचनेशी घालणे अत्यंत आवश्‍यक आहे. तत्कालिक फायद्यासाठी मूलभूत संरचनेला धोका पोहोचवणे हिताचे नाही, असे सांगत वित्तीय तूट आणि विकासदर यांच्यातही समतोल राखला गेला पाहिजे यावर जेटली यांनी भर दिला.याआधी विशेष तारतम्य न ठेवता दिल्या गेलेल्या कर्जांमुळे बॅंकिंग व्यवस्थेवर बुडीत कर्जांचा ताण पडला आहे. जुन्या बुडीत कर्जांची समस्या आज अत्यंत गंभीर झाल्याचेही त्यांनी नमूद केले.हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

नादारी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे कर्जदाता आणि कर्जदार यांच्यात नव्याने संबंध प्रस्थापित झाले आहेत, असे सांगत ही व्यवस्था वेगाने पुढे नेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आगामी काळात असा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील 29 अ कलमानुसार आधी कर्ज बुडवलेल्या प्रवर्तकांना लिलावात भाग घेण्यापासून रोखले जाणार आहे. या कायद्यातील नव्या तरतुदींमुळे सरकारी अधिकारी, बॅंकिंग क्षेत्र आणि निर्णय प्रक्रियेतील इतर सर्व लोकांना विशेष अधिकार मिळाले आहेत. बॅंकिंग क्षेत्रासमोरची आव्हाने आणि इतर मदतीसाठी बॅंक संघटनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे आणि भविष्यातही ती महत्त्वाची ठरेल, असा विश्वास यावेळी बॅंक संघटनेचे अध्यक्ष शाम श्रीनिवासन यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)