बॅंकांचा संप आणि सुट्ट्यांचा आठवडा 

मुंबई: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवघे दोन दिवसच बॅंका सुरू राहणार आहेत. त्यामुळे एटीएममध्ये पैशांची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता नाकराता येत नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीला 2 तारखेला रविवार आहे. यानंतर 3 सप्टेंबरला जन्माष्टमीमुळे सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यानंतर बॅंक कर्मचाऱ्यांनी पेन्शन आणि अन्य मुद्यांवर दोन दिवसांचा संप पुकारला आहे. म्हणजे 4 आणि 5 तारखेला संपामुळे बॅंकेचे कामकाज होणार नाही.
यानंतर 6 आणि 7 तारखेला बॅंकांचे कामकाज चालेल. यानंतर पुन्हा दोन दिवसांची सुट्टी असणार आहे. सलग चार दिवस कामकाज बंद राहणार असल्याने या काळातील प्रलंबित असलेले व्यवहार 6 आणि 7 सप्टेंबरला होतील. म्हणजेच चार दिवसांचे काम आणि त्या दोन दिवसांचे असा कामाचा भार बॅंकांवर असणार आहे. अशा प्रकारे सप्टेंबरच्या पहिल्या 10 दिवसांपैकी 6 दिवस बॅंकांचे कामकाज ठप्प राहणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)