बुलेट ट्रेनविरोधात ‘मनसे’चा पत्रप्रपंच

File pic

मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याची मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्राद्वारे केली आहे. पोस्टाद्वारे एक हजार पत्र राष्ट्रपतींना पाठवली असून तब्बल ५० हजार पत्रे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

रेल्वेबाबत अत्यंत विदारक परिस्थिती असताना काही गर्भश्रीमंत लोकांसाठी बुलते ट्रेनचा प्रकल्प राबवला जात आहे. हा प्रकल्प अव्यवहार्य असून आजही ४५ टक्के रेल्वे रिकाम्या धावतात. देशाच्या अनेक भागामध्ये रेल्वेसेवा पोहचली नाही. त्यामुळे आम्हाला बुलेट ट्रेन नको अशी मागणी पत्राद्वारे मनसेने राष्ट्रपतींकडे केली आहे. तसेच आपल्या अधिकारात हा प्रकल्प त्वरित रद्द करावा, अशी विनंती मनसेने केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)