बुलढाण्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

बुलढाणा – बुलढाण्यात एका तरुण शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून, त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. सिंदखेडराजा तालुक्‍यातील सावरखेड तेजन गावात ही धक्कादायक घटना घडली. गजानन जायभाये (वय 35 वर्ष) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

गजानन जायभाये यांची तीन एकर शेती आहे. मात्र कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर महाराष्ट्र बॅंकेचे 70 हजार रुपयांचे कर्ज होते. त्यात कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना आणखी कर्ज मिळू शकले नाही. कर्जमाफ होऊन पुन्हा बॅंकेकडून कर्ज मिळेल या आशेवर यंदा शेतीच्या मशागत आणि पेरणीसाठी गजानन यांनी बाहेरुन कर्ज घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्जासाठी त्यांनी महाराष्ट्र बॅंकेच्या खूप चकरा मारल्या, पण कर्ज मिळाले नाही. आपल्याकडचे दागिने पतसंस्थेत गहाण ठेवले होते. मात्र बॅंकेकडून कर्ज मिळण्याबाबत संभ्रमाला कंटाळून गजानन जायभाये यांनी काल रात्री उशिरा (29 जुलै) आपल्या शेतात सरण रचले. त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. पोलिसांनीही आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)