बुध कॉलेजमध्ये युवकांना मतदार जागृती प्रबोधन

बुध : युवकांना मार्गदर्शन करताना मोहनराव गुरव (छाया : प्रकाश राजेघाटगे)

बुध, दि. 13 (प्रतिनिधी)- बुध येथील श्री नागनाथ ज्युनिअर कॉलेजमध्ये तालुका नोडल टीचर श्री मोहनराव गुरव यांनी भेट देऊन निवडणूक प्रक्रिया कशी चालते. विविध मशिन्स तसेच व्ही. व्ही. पॅटची माहिती दिली. मतदान प्रक्रियेतील विविध फॉर्मसची माहीती दिली. युवकांनी मतदार जागृतीसाठी आपले योगदान द्यावे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे प्रबोधन करावे.इएलसी क्‍लबद्वारे आपले मतदार जागृतीचे काम प्रभावीपणे करुया, आपले मत अनमोल आहे. असे विचार मांडले. यावेळी युवकांना प्रत्यक्ष चर्चेत सहभागी करुन घेण्यात आले. कार्यक्रमास प्रा.नवगिरे के. एस. व सहकारी उपस्थित होते. सरवदे सरांनी सूत्रसंचालन केले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)