बुद्धिबळ स्पर्धा : 15 खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा केला सनसनाटी पराभव

सुंदरराजन किदंबी, मुथय्या, सत्यप्रग्यान स्वयंगसु, समीर काठमळे, हेरंब भागवत संयुक्‍त आघाडीवर
श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुली फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा 
पुणे: सुंदरराजन किदंबी, मुथय्या एएल, सत्यप्रग्यान स्वयंगसु, समीर काठमळे, हेरंब भागवत यांसह एकूण 15 खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा सनसनाटी पराभव करताना 15व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत 3 गुणांसह स्‌ंयुक्‍त आघाडीचे स्थान मिळवले आहे.
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत तिस-या फेरीत तमिळनाडूच्या अव्वल मानांकित ग्रॅन्डमास्टर सुंदराराजन किदंबीने महाराष्ट्राच्या मनोज जैनचा पराभव करून 3 गुण प्राप्त केले. तसेच तमिळनाडूच्या मुथय्या एएल याने महाराष्ट्राच्या आर्यन शहाचा 3 गुण मिळवले.
आजच्या अन्य सामन्यांमध्ये आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसुने महाराष्ट्राच्या सत्यम वरूडेवर निर्णायक मात करताना आघाडीच्या स्थानावर झेप घेतली. तसेच रेल्वेच्या आयएम रत्नाकरनने महाराष्ट्राच्या दिगंबर जाईलचा पराभव करताना आपली आगेकूच कायम राखली. महाराष्ट्राच्या आयएम समीर काठमळेने आपल्याच संघाच्या प्रणित कोठारीचे आव्हान मोडून काढले. तर महाराष्ट्राच्या तनिशा बोरमणीकरने पश्‍चिम बंगालच्या चंद्रेयी हजराचा प्रतिकार मोडून काढताना विजयी आगेकूच केली. आणखी एका लढतीत एजीएम किरण पंडितरावने अनीश अगवणेचा चुरशीच्या लढतीत पराभव केला.
सविस्तर निकाल- 
तिसरी फेरी-
मनोज जैन (महा-2 गुण) पराभूत वि. ग्रॅन्डमास्टर सुंदरराजन किदंबी (तमिळनाडू-3 गुण); मुथय्या एएल (तमिळनाडू-3 गुण) वि.वि. आर्यन शहा (महा-2 गुण)
सत्यम वरूडे (महा-2 गुण) पराभूत वि. आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु (ओडिसा-3 गुण); हरिकृष्णा ए.आरए (तामिळनाडू-3 गुण) वि.वि स्पर्श खंडेलवाल (महा-2 गुण), जाईल दिगंबर (महा-2 गुण) पराभूत वि, आयएम रत्नाकरन (रेल्वे-3 गुण); एफएम अमेय ऑडी (गोवा-3 गुण) वि.वि. शुभम कुंठेकर (महा-2 गुण), आयएम समीर काठमळे (महा-3 गुण) वि.वि. प्रणित कोठारी (महा-2 गुण), सम्मेद शेटे (एएमसीए-3 गुण) वि.वि. श्रेयान मजुमदार (महा-2 गुण), एफएम सोहन फडके (महा-2 गुण) पराभूत वि, हेरंब भागवत (महा-3 गुण), रवी बेहेरे (महा-2 गुण) पराभूत वि. रित्वीज परब (गोवा-3 गुण), चंद्रेयी हजरा (बंगाल-2 गुण) पराभूत वि तनिशा बोरमणीकर (महा-3 गुण), एफएम मट्टा विजय कुमार (आंध्रप्रदेश-3 गुण) वि.वि अनुष्का भांगे (महा-2 गुण), एजीएम किरण पंडितराव (सीआरएसबी-3 गुण) वि.वि अनीश अगवणे (महा-2 गुण), कपिल लोहाना (महा-3 गुण) वि.वि गिरीश जोशी (महा-2 गुण), अमेय दांडेकर (महा-2 गुण) पराभूत वि, सिद्धांत गायकवाड (महा-3 गुण).
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)