बुद्धिबळ स्पर्धा: सम्मेद शेटेची आंतरराष्ट्रीय मास्टर रत्नाकरनवर सनसनाटी मात

श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा
सातव्या फेरीअखेर महाराष्ट्राचा सम्मेद शेटे आघाडीवर

पुणे: महाराष्ट्राचा सम्मेद शेटे याने रेल्वेचा आंतरराष्ट्रीय मास्टर रत्नाकरन के. याच्यावर सनसनाटी मात करताना एकूण 6.5 गुणांसह 15व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत आपली आघाडी कायम ठेवली आहे. बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील सातव्या फेरीत महाराष्ट्राचा युवा खेळाडू सम्मेदने आपल्या विजयमालिकेत सातत्य राखत रेल्वेच्या तृतीय मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर रत्नाकरन के. याला पराभवाचा धक्‍का दिला. सम्मेदने बी06 किंग पॉन फिन्चिटो पद्धतीने सुरुवात करत रत्नाकरनवर 33 चालींमध्ये मात केली व सनसनाटी निकाल नोंदविला.

आणखी एका महत्त्वाच्या सामन्यात जाईल दिगंबरने फीमेल मास्टर एस. जी. जोशीचा पराभव करून आश्‍चर्यकारक निकालाची नोंद केली. या विजयामुळे जाईलने एकूण 5.5 गुणांची कमाई केली. तसेच महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने गोव्याच्या रित्वीज परबवर विजय मिळवताना आपली आगेकूच कायम राखली. या विजयामुळे विक्रमादित्यने एकूण 6.5 गुण मिळवले. महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मास्टर समीर काठमळेने तमिळनाडूचा ग्रॅंडमास्टर सुंदराराजन किदांबीला बरोबरीत रोखताना आजचा दिवस गाजविला. या बरोबरीमुळे समीरने आपली गुणसंख्या 5.5 गुणांवर नेली.

सविस्तर निकाल-
सातवी फेरी – (व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार) – सम्मेद शेटे (महा-6.5 गुण) वि.वि. आयएम रत्नाकरन के. (रेल्वे-5.5 गुण), आयएम विक्रमादित्य कुलकर्णी (महा-6.5 गुण) वि.वि. रित्वीज परब (गोवा-5.5 गुण), आयएम समीर काठमळे (महा-5.5 गुण) बरोबरी वि. ग्रॅंडमास्टर सुंदरराजन किदांबी (तामिळनाडू-5.5 गुण), एजीएम किरण पंडितराव (सीआरएसबी-5.5 गुण) बरोबरी वि. आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु (ओडिसा-5.5 गुण), हेरंब भागवत (महा-5 गुण) पराभूत वि. हरिकृष्णा ए.आरए (तामिळनाडू-6 गुण), मुथय्या एएल (तामिळनाडू-5.5 गुण) वि.वि. मनीष जोशी (रेल्वे-4.5 गुण), कशिष जैन (महा-4.5 गुण) पराभूत वि. आयएम अभिषेक केळकर (सीआरएसबी-5.5 गुण), एफएम सोहन फडके (महा-5.5 गुण) वि.वि. संजीव नायर (महा-4.5 गुण), अतुल डहाळे(महा-5 गुण) बरोबरी वि. वेदांत पिंपळखरे (महा-5 गुण), एफएम मट्टा विजय कुमार (आंध्रप्रदेश-5.5 गुण) वि.वि. आर्यन शहा (महा-4 गुण), जाईल दिगंबर (महा-5.5 गुण) वि.वि. एफएम एस.जी.जोशी (महा-4 गुण), डब्ल्यूआयएम चंद्रेयी हजरा (पश्‍चिम बंगाल-5 गुण) वि.वि. एएफएम अर्णव मेहेते (महा-4 गुण), एआयएम राकेश कुलकर्णी (महा-4.5 गुण) वि.वि आयुष महाजन (महा-3.5 गुण), जयंत काटदरे (महा-5.5 गुण) वि.वि. प्रणित कोठारी(महा-4.5 गुण), कपिल लोहाना (महा-5 गुण) वि.वि. रोहित मोकाशी (महा-4.5 गुण), शुभम कुमठेकर (महा-5 गुण) वि.वि. कुशार्ग जैन (महा-4 गुण).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)