बुद्धिबळ स्पर्धा: ‘यांनी’ उदघाटनाचा दिवस गाजवला

सुंदराराजन किदंबी, सत्यप्रग्यान स्वयंगसू, रत्नाकरन, अभिषेक केळकर, समीर कठमळे, विक्रमादित्य कुलकर्णी यांनी उदघाटनाचा दिवस गाजवला

श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे: तमिळनाडूचा ग्रॅन्डमास्टर सुंदराराजन किदंबी व मुथय्या एएल, ओरिसाचा आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु, सेंट्रल रेल्वेचा आयएम रत्नाकरन, तसेच महाराष्ट्राचा आयएम समीर कठमाळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित 15व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचा उद्‌घाटनाचा दिवस गाजवला.

अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या फेरीत तमिळनाडूच्या अव्वल मानांकित ग्रॅन्डमास्टर सुंदराराजन किदंबीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत महाराष्ट्राच्या वरद वाल्देचा पराभव करून 1 गुण प्राप्त केला. तामिळनाडूच्या मुथय्या एएलने महाराष्ट्राच्या इशान कुतवळविरुद्ध 1 गुण मिळवला. ओरिसाच्यादुसऱ्या मानांकित आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसुने महाराष्ट्राच्या इशान सोमय्याचा पराभव करून विजयी सलामी दिली.

सेंट्रल रेल्वेच्या तिसऱ्या मानांकित आयएम रत्नाकरन के. याने महाराष्ट्राच्या तुषार चव्हाणचा पराभव करून 1 गुण मिळवला. सीआरएसबीच्या चौथ्या मानांकित आयएम अभिषेक केळकरने महाराष्ट्राच्या ज्योतिरादित्य देशपांडेचा पराभव करून 1 गुण प्राप्त केला. महाराष्ट्राच्या आयएम समीर कठमळेने आपला राज्य सहकारी अनिश आगवनेचा पराभव करून शानदार सुरुवात केली.

गोव्याच्या एफएम अमेय ऑडी व रित्वीज परब, महाराष्ट्राच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, एफएम सोहन फडके, अतुल डहाले, एएमसीएच्या सम्मेद शेटे आणि आंध्रप्रदेशच्या एफएम मट्टा विजय कुमार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून एका गुणाची कमाई केली. त्याआधी स्पर्धेचे उद्‌घाटन एएमसीएचे सचिव विजय देशपांडे, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक जयंत भावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, पीडीसीसीचे सचिव राजेंद्र कोंडे, नितीन शेणवी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ग्रॅंडमास्टर अभिमन्यू पुराणिक आणि आयएम सौम्या स्वामिनाथन यांचा सत्कार करण्यात आला.

सविस्तर निकाल-
पहिली फेरी- (व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार) –
वरद वाल्दे (महा-0 गुण) पराभूत वि. ग्रॅन्डमास्टर सुंदराराजन किदंबी (तमिळनाडू-1 गुण);
मुथय्या एएल (तमिळनाडू-1 गुण) वि.वि. इशान कुतवळ (महा-0 गुण);
इशान सोमय्या (महा-0 गुण) पराभूत वि. आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसु (ओडिशा-1 गुण);
हरिकृष्णा ए.आरए (तामिळनाडू-1 गुण) वि.वि. आदिती कायल (महा-0 गुण);
तुषार चव्हाण (महा-0 गुण) पराभूत वि. आयएम रत्नकरण के. (रेल्वे-1 गुण);
एफएम अमेय ऑडी (गोवा-1 गुण) वि.वि. अनुष्का कुतवळ (महा-0 गुण);
ज्योतीरादित्य देशपांडे (महा-0 गुण) पराभूत वि. आयएम अभिषेक केळकर (सीआरएसबी-1 गुण);
आयएम समीर काठमळे (महा-1 गुण) वि.वि. अनिश आगवने (महा-0 गुण);
लालागोविंद कोल्पेक (महा-0 गुण) पराभूत वि. आयएम विक्रमादित्य कुलकर्णी (महा-1 गुण);
सम्मेद शेटे (एएमसीए-1 गुण) वि.वि. तुषार ठक्‍कर (महा-0 गुण);
एफएम सोहन फडके (महा-1 गुण) वि.वि. श्रावणी आंबवले (महा-0 गुण);
सिध्दार्थ कर्नाळकर (महा-0 गुण) पराभूत वि. रित्वीज परब (गोवा-1 गुण);
अतुल डहाले (महा-1 गुण) वि.वि. अभिषेक दंडवते (महा-0 गुण);
पुष्कराज साळुंके (महा-0 गुण) पराभूत वि. एफएम मट्टा विजय कुमार (आंध्रप्रदेश-1 गुण).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)