बीड : अर्धपिपंरीमध्ये नळ योजनेचे उद्घाटन संपन्न 

बीड – अर्धपिपंरी तालुका गेवराई जिल्हा बीड येथे १५ वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनेचे  उद्घाटन  शुक्रवारी गावचे प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र देशपांडे यांच्या हस्ते पार पडले. गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नळ योजना रखडल्याने  महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. ही अडचण लक्षात घेऊन गावच्या सरपंच केशरबाई साळवे यांच्या पुढाकारातून गावातील  नळ योजनेचं काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेतून गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय होणार असून, महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असल्यानं या योजनेचे ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग (ग्रामपंचायत स्तर) निधीतून या योजनेचे काम होणार आहे. या नळयोजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून, या योजनेतंर्गत  पाइपलाइनची सोय उपलब्ध करून गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचं यावेळी बोलताना  सरपंच केशरबाई साळवे यांनी सांगितलं. या योजनेच्या  उद्घाटन प्रसंगी उपसरपंच गीता शेलुटे, सामाजिक कार्यकर्ते, राम गाडे,पांडुरंग वेदपाठक, दादासाहेब  रुपनर, अशोक डोंगरे, जयराम  हापटे, राघू इंगावले, श्रीराम गोरे, हरी शेलुटे  यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)