बीजिंगमध्ये अमेरिकन दूतावासाजवळ मोठा स्फोट

बीजिंग (चीन) – बीजिंगमधील अमेरिकन दूतावासाजवळ मोठा स्फोट झाला आहे. गुरुवारी दुपारी एकच्या दरम्यान रस्त्यावर झालेल्या या स्फोटाने परिसर हादरून गेला आणि सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

अमेरिकेच्या दूतावासाच्या दक्षिण-पूर्व दिशेला हा स्फोट झाला. एका व्यक्तीने अमेरिकन दूतावासाच्या जवळच बॉंबस्फोट केल्याची माहिती दूतावासाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने दिली आहे. मात्र या बॉंबस्फोटात स्फोट घडवून आणणाराशिवाय कोणीही जखमी अथवा ठार झालेले नाही. दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्फोट झाला त्या ठिकाणापासून जवळच भारतीय दूतावासही आहे. भारतीय दूतावासाची कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. मानवी हक्कांसंबंधात लक्ष वेधून घेण्यासाठी या व्यक्तीने बॉंबस्फोट केला असावा अशी माहिती एका व्हिसा एजंटाने दिली आहे.

स्फोट घडवून आणणारा मंगोलियाचा निवासी असल्याची आणि तो जखमी झाल्याची माहितीही त्याने दिली आहे. मात्र या संदर्भात पोलीसांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. हा बॉंबस्फोट होण्यापूर्वी काही तास एका महिलेने त्याच भागात स्वत”च्या शरीरावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या दोन घटनांमध्ये काही संबंध आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)