“बीआरटी’ मार्गातून खासगी वाहने सुसाट

पिंपरी – काळेवाडी फाटा चौकात हातगाडीधारक, रिक्षा, छोटे-छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणधारकांमध्ये हातगाडीवाल्यांची संख्या जास्त आहे. त्यात बेशिस्त रिक्षाचालक भर घालत आहेत. बीआरटी मार्गावर खासगी वाहनांची घुसखोरी वाढली असताना वाहतूक पोलीस गांधारीच्या भूमिकेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

काळेवाडी फाट्यावरून रहाटणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच रिक्षा लावतात. त्यामुळे चारचाकी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होतो. रहाटणीकडून काळेवाडी फाट्याकडे येणाजया रस्तावर भाजीविक्रेते मोठ्या संख्येने असतात. भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक येतात. यातील बेशिस्त ग्राहक दुचाकी, चारचाकी रस्त्यावरच पार्किंग करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. काळेवाडी फाटाकडून डांगे चौकात जाणाजया रस्त्यावर पुलाखाली वाहने लावली जातात. बऱ्याच वेळा वाहने रस्त्यावरच असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डांगे चौकातून काळेवाडी फाट्याकडे येणाऱ्या रस्त्यावर त्या ठिकाणी असलेले दुकाने, दवाखाना, कार्यालयांमध्ये येणाऱ्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरच लावली जातात. काळेवाडी फाट्यावरून थेरगावला जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी वाहने लावण्यात येतात. काळेवाडी फाट्यावर बीआरटीचा मार्ग देखील आहे. अनेक वेळा बीआरटीची बस चौकातच बंद पडते. त्यामुळे वाहनांची कोंडी होते. या बीआरटी मार्गाचा वापर केवळ पीएमपीएलच्या बसेसने करावा असा ठराव करण्यात आला आहे मात्र या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने या मार्गाचा वापर सर्रास इतर वाहन चालकांकडून होताना दिसतो.

काळेवाडी फाट्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण कमी प्रमाणात केले असेल, तरी देखील काळेवाडी फाट्यावर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. काळेवाडी परिसरातील अनेक ठिकाणचे पदपथ गायब झाले आहेत. औंधकडून काळेवाडीला येणाऱ्या रस्त्यावर पदपथ नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे कारवाई करुन पदपथ मोकळे करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

त्या वाहनांवर कारवाईची मागणी
काळेवाडी फाटा या ठिकाणी वापरासाठी असलेला रस्ता प्रशस्त आहे. मात्र बेशिस्त पार्किंगमुळे या चौकात वाहतूक कोंडी होते. चौकाच्या चारही बाजूंनी बेशिस्त पार्किंग केले जाते. त्याचप्रमाणे रिक्षा रस्त्यावरच लावल्यामुळे चारचाकी वाहनास अडथळा निर्माण होतो. विरुद्ध दिशेने वाहन चालवून बेशिस्त वाहन चालक इतर वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. अशा वाहन चालकांवर कारवाईची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)