बिहारच्या नालंदा मेडिकल कॉलेजात पाणी आयसीयूत पोहतात मासे

पटणा: बिहारच्या प्रसिद्ध नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले असून आयसीयू वार्डमध्येही पाणी घुसले आहे. आयसीयूमधील पाण्यात मासे पोहत असल्याचे आढळून आले आहे. गेले दोन दिवस चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण्यात हाहाकार माजला आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्याची पातळी 2 ते 4 फूट इतकी झालेली आहे.
एनएमसीएच-नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल हे बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. मात्र या नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्ची अवस्थ अतिशय दारूण झालेली आहे. नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले आहे. वार्डमध्ये कॉटवर, स्ट्रेचरवर रुग्ण आहेत आणि खाली फरशीवर पाणी भरलेले आहे. साठलेल्या पाण्यात पाण्यात किडे वळवळत आहेत. आयसीयूमध्येही पाणी घुसले आहे. आणि त्यात मासे पोहताना दिसत आहेत.आणि अशातच डॉक्‍टर उपचार करत असल्याचे चित्र आहे.
या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो पेशंट येतात. पण आता पुराच्या पाण्यामुळे सारे विस्कळीत झाले आहे. पटणाची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या बेली रोडच एक भाग खचून गेला आहे. इतकेच नाही, तर उप मुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या सरकारी निवासातही पाणी शिरले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)