“बिर्ला’वर पुन्हा तक्रार!

प्रशासनाची अरेरावी : “स्वाभीमानी’च्या कार्यकर्त्याला धक्‍काबुक्‍की

पिंपरी  – माहिती विचारण्यासाठी गेलेल्या स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना शिविगाळ व धक्काबुक्की केल्यावरुन आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनावर वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची सामन्य नागरिकांना मिळणारी वागणूक हा वादाचा मुद्दा ठरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वाभिमान संघटनेचे प्रशांत मधुकर गायकवाड (वय 29, रा. ठाणे मुंबई) यांनी ही तक्रार दिली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, समर्थ सागर राणे ह्या दहा महिन्याच्या मुलाला 15 ऑगस्ट रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पालकांनी उपचारांच्या बिलाचे कोटेशन देऊन रुग्ण आयपीएफ (धर्मदायी रुग्णालय) योजनेत बसवावे अशी विनंती केली होती व संबंधीत कागदपत्रांची माहिती मागवली मात्र प्रशासनाने जाणूनबुजून सात दिवसाचा विलंब लावून ती माहिती देण्यात आली.प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे संबंधित बालकाला त्याचा लाभ मिळाला नाही, तर दोन दिवसांनी ते बालकही मयत झाले. या घटनेची विचारणा करण्यास गेले असता गायकवाड व त्यांच्या सहकारी विक्रम कदम यांना माहिती न देता शिवीगाळ करत धक्‍क्‍कबुक्की करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयाचे दोन कर्मचारी व सुरक्षारक्षक यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

रुग्णालय प्रशासनावर नाराजी…
नुकतेच एका रुग्णाला डांबून ठेवल्या प्रकरणी रुग्णालयाच्या डॉ. रेखा दुबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला व होता. त्यांना या प्रकरणी अटक झाली व पुढे जामिनावर सुटकाही झाली. मात्र, प्रशासानाद्वारे रुग्णांना मिळणारी वागणूक व त्याद्वारे होणारा मानसीक त्रास हा वादाचा मुद्दा बिर्ला येथे होणाऱ्या सततच्या घटनांमुळे चिघळत आहे. त्यामुळे बिर्ला रुग्णलयाच्या प्रशासनाच्या मनमानीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्‍त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)