“बियोंड द क्‍लाऊड्‌’साठी कंगणा आणि दीपिकानेही दिली होती ऑडिशन

“बियोंड द क्‍लाऊड्‌स’च्या लीड रोलसाठी मल्याळम ऍक्‍ट्रेस मालविका मोहनन हीची निवड झालेली आपण पाहतो आहोत. आंतरराष्ट्रीय किर्तीचे दिग्दर्शक मजिद मजिदीच्या सिनेमामध्ये लीड रोलसाठी निवडले जाणे ही गोष्ट मालविका मोहननसाठी निश्‍चितच भाग्याची आहे, असे म्हणायला हवे. कारण या रोलसाठी कंगणा रणावत आणि दीपिका पदुकोण यांनीही ऑडिशन दिली होती.

मजिद मजिदी यांनी सर्वप्रथम या रोलला लीडींग ऍक्‍ट्रेसना संधी द्यायचे ठरवले होते. मात्र नंतर नवीन चेहऱ्याचा प्रयोग केला जाऊ शकेल, असे त्यांना वाटले. त्यामुळेच हा रोल आपल्याला मिळाल्याचे मालविका म्हणाली. सर्वसाधारणपणे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी हिरो किंवा हिरोईनच्या रोलला प्राधान्य दिले जाते. मात्र “बियोंड द क्‍लाऊड्‌स’मध्ये बहिणीच्या रोलमधून मालविकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कारण ही कथा भावा बहिणीची कथा आहे. या सिनेमामधून तिच्या पदार्पणाची घोषणा झाल्यापासून मालविकाची तुलना जान्हवी कपूर आणि सारा अली खानबरोबर केली जाते आहे.

मात्र स्टार किड्‌सबरोबर तुलना करणे गैर आहे. कारण अक्षय, कतरिना, दीपिका, प्रियाक़्का हे काही स्टार किड्‌स नाहीत. पण त्यांनी बॉलिवूड गाजवले आहे, असे मालविका म्हणते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)