बिटकॉईन प्रकरणी पाच जणांच्या पोलीस कोठडीत वाढ

विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांचा आदेश
पुणे – बिटकॉईन गुंतवल्यास आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणात निगडी पोलिसांनी अटक केलेल्या 2 आरोपींना 3 मेपर्यंत तर, दत्तवाडी पोलिसांनी अटक केलेल्या 3 आरोपींना 5 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला आहे.

निगडी पोलिसांनी, अमित महेंदरकुमार भारद्वाज (वय 35, व्हिलेज शालीमार बाग, नवी दिल्ली ), विवेककुमार महेंदरकुमार भारद्वाज (31) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी भीमसेन बाबुराम आगरवाल (65 रा. निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपताच पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी तिघांच्या पोलीस कोठडीत 3 मेपर्यंत वाढ करण्यात आली. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. गौरव जाचक यांनी काम पाहिले.

दत्तवाडी पोलिसांनी, हेमंत चंद्रकांत भोपे (46, डी. एस. के. विश्व धायरी), हेमंत विश्वास सूर्यवंशी (51, बाणेर) पंकज श्रीनंदकुमार आदलाखा (40, जनकपुरी, नवी दिल्ली) अटक केलेल्या आरोपींना 5 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या विरुद्ध निशा चैतन्य रायसोनी (46) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. बिपीन पाटोळे, ऍड. सत्यव्रत जोशी, ऍड. धैर्यशील पाटील, ऍड. मानस ठाकोर यांनी पोलीस कोठडीला विरोध केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)