बिजवडीत मराठा समाजाची रॅली

बिजवडी ः हजारो मराठा बांधवांनी गावातून काढलेली रॅली.

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद : शासनाचा निषेध

बिजवडी, दि. 25 (वार्ताहर) – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतल्यानंतर शासनाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. बिजवडीमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठा समाजाने गाव पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी हजारो मराठा बांधवांनी गावातून रॅली काढली. आंदोलनाला धनगर समाजाच्या वतीनेही पाठिंबा देण्यात आला होता.
याप्रसंगी एम. के. भोसले, संजय भोसले यांनी मराठा समाज हक्काच्या मागणीसाठी लढा देतोय. मराठा समाज संख्येने मोठा असूनही कधीच जातीवाद करत नाही. परंतु, त्यांच्या सोशिकतेचा फायदा घेतला जात आहे. आरक्षणामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय होत आहे. शासनाने वेळीच आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होवू शकतो.
यावेळी बापूराव गुंजवटे, हणमंतराव भोसले, संदीप भोसले, प्रशांत विरकर यांनी मनोगते व्यक्त केली. आभार दिलीपराव भोसले यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)