बिग बॉस मराठी : मेघा धाडेकडे कॅप्टन पदाची धुरा

बिग बॉसच्या घरातील आस्ताद काळेच्या कॅप्टन पदाचा कार्यकाळ संपल्याने काल बिग बॉसने नवीन कॅप्टन निवडण्यासाठी नव्या टास्कची घोषणा केली गेली. रेशम टिपणीस, मेघा धाडे आणि सई लोकुर यांच्यात हा टास्क रंगला. ‘कॅप्टनसी विंग’ या टास्कमध्ये कुठलाही स्पर्धक शक्तीचे प्रदर्शन न करता बुद्धीचा वापर करून विंग वरून प्रतिस्पर्धकाला हात सोडविण्यास भाग पाडू शकतो असा बिग बॉसने आदेश दिला होता.

काही काळातच रेशमने या टास्कमधून माघार घेतली. मेघा आणि सई मध्यरात्री पर्यंत हा टास्क खेळत होत्या. अखेर सईने देखील या टास्कमधून माघार घेत मेघाला विजेता घोषित केले. त्यामुळे आता बिग बॉसच्या कॅप्टन पदाची धुरा मेघाच्या हातात असणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)