बाहुबली आंद्रे रसेल ; आंद्रे रसेलच्या खेळीवर शाहरुखची प्रशंसा

बंगळुरू – आंद्रे रसेलने 13 चेंडूत सात षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने केलेल्या नाबाद 48 धावांच्या बळावर, कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 चेंडू आणि 5 गडी राखून पराभव करत आगेकूच नोंदवली. आंद्रे रसेलच्या या तडाखेबाज कामगिरीमुळे, कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि अभिनेता शाहरुख खानने आंद्रे रसेलला बाहुबली या चित्रपटातील नायक बाहुबली असल्याचे म्हंटले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने तुफान फटकेबाजी केली होती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा विजय सुकर झाला होता. यानंतर शाहरुख खानने आपल्या ट्विटर खात्यावरून संघातील खेळाडूंची प्रशंसा करत  बाहुबलीच्या वेशातील आंद्रे रसेलचा फोटो ट्विट केला.

https://twitter.com/iamsrk/status/1114239013169324034

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)