बावधन येथे घरफोडी, एक लाखाचा ऐवज लंपास

वाई, दि. 29 (वार्ताहर) – नवीन गावठाण बावधन येथील बंद घराचे कुलुप तोडून 1 लाख 5 हजारांचा ऐवज व रोकड चोरट्यांनी लंपास केली.
याबाबत दिनकर गणपती राऊत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 27 रोजी कार्यक्रमानिमित्त ते मुंबईला गेले होते. कार्यक्रम उरकून बावधनला परत येत असताना दि. 29 रोजी पहाटे त्यांच्या शेजाऱ्यांनी घरी चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पहाटे साडेपाच वाजता बावधन येथे येवून खात्री केली असता चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 80 हजारांचे दागिने व 25 हजार रोकड चोरल्याचे आढळून आले. तसेच चोरटयांनी शेजारील पाच घरांची घरफोडी करण्याचाही प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. ही चोरी चोरटयांनी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास केली असावी. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, पोलिस निरिक्षक विनायक वेताळ यांनी भेट देवून पाहणी केली. घटनास्थळी श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते. तपास पोलिस उपनिरिक्षक एम.एस. निबांळकर करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)