बावडा येथे अपघातात तरुणाचा मृत्यू

बावडा – बावडा (ता. इंदापूर) येथे दुचाकी व तिन चाकीच्या भीषण अपघातात सागर सुरेश नरसाळे (वय 27, रा. आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची चुलत बहीण जखमी झाली आहे.
बावडा पोलिसांनी सांगितले की, मयत सागर हा त्याच्या चुलत बहिणीच्या ऍडमिशनच्या कामांसाठी गेला होता. तो त्याच्या बुलेट दुचाकी (क्र.एमएच 45 वाय 7772) वरुन परतत असताना बावडा नजीक जीवननगर येथील वळणावर तिन चाकी प्यॅजो टमटम (क्र. एमएच 01 एल 3016) भाजीपाला घेऊन
बावड्याकडे येत होता. या टमटमला सागरच्या दुचाकीची धडक बसल्याने तो जागीच ठार झाला तर त्याची चुलत बहीण जखमी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.