बाळासाहेबांची तीच परंपरा उद्धव जोपासतायेत – सुभाष देसाई

पिंपरी – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अन्याय करणाऱ्यावर आसूड ओढताना समाजासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली. तीच परंपरा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जोपासत आहेत, असे गौरवोद्‌गार राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

उद्धवश्री पुरस्कार समिती पुणे, पिंपरी-चिंचवड शहरतर्फे देण्यात येणाऱ्या “उद्धवश्री’ पुरस्कारांचे वितरण सुभाष देसाई यांच्या हस्ते बुधवारी (दि. 29) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, संपर्क प्रमुख बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शहर प्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहर संघटक सुलभा उबाळे, नगरसेवक प्रमोद कुटे, कामगार नेते इरफान सय्यद, अमित धुमाळ, अभिनेते भुषण कडू, अभिनेत्री पुजा माळेकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुभाष देसाई म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी समाजातील प्रत्येक स्तरावरच्या व्यक्तीच्या कार्यावर लक्ष ठेवून त्याचा गौरव केला. कवी कुसूमाग्रज यांचा जसा नाशिकला त्यांच्या घरी जावून सन्मान केला, तसा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा गौरव शिवसेनेच्या अधिवेशनात केला. शिवसेनेला हा व्यक्ती बाधक होईल, याची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही. उलट कॉम्रेड डांगे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान, त्यांचे वक्तृत्व अमोघ होते, याची जाणीव शिवसेना प्रमुखांनी समाजाला करून दिली. शिवसेना प्रमुखांनी किंवा शिवसेनेने छोटा आणि खोटा विचार कधीच बाळगला नाही. पुरस्कार, सन्मान म्हणजे समाजासाठी केलेल्या कार्याची पावती असते. शिवसेनेने ही परंपरा नेहमीच जपली आहे, असेही ते म्हणाले.

गुलाब गरूड यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी शिंदे व भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. माधव मुळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)