बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथीचे कौडगाव शिवारात आयोजन

प्रेस क्‍लबच्या वतीने जिल्हाधिकारी द्विवेदींच्या हस्ते दिली जाणार मदत
नगर – मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीचे आयोजन प्रेस क्‍लबच्या वतीने बुधवार, दि. 16 मे रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत कौडगाव येथे करण्यात आले आहे. जांभेकरांच्या विचाराचा वारसा जपत कौडगाव येथे सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामात श्रमदानाद्वारे कृतियुक्त सहभाग नोंदवत प्रेस क्‍लबच्या वतीने जलसंधारणाच्या कामासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते रोख स्वरूपाची मदत दिली जाणार असल्याची माहिती प्रेस क्‍लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी दिली.
“दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचा पाया घातला. त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रेस क्‍लबच्या वतीने प्रतिवर्षी सामाजिक कार्यात सहयोग देत जांभेकरांचे कृतियुक्त पुण्यस्मरण करण्याचा प्रेस क्‍लबचा मानस असतो. दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. जांभेकरांच्या पुण्यतिथी उपक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षीही कौडगाव येथील जलसंधारणाच्या कामात पत्रकार बांधव श्रमदान करीत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
पूर्वी प्रेस क्‍लबने नगर तालुक्‍यातील अकोळनेर येथे असा उपक्रम राबविला होता. यावर्षी कौडगावची निवड करण्यात आली आहे. पत्रकारांनी स्वतः श्रमदान करून आपल्या कृतीतून गावकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असा यामागील उद्देश आहे. तरी आपण या कृतियुक्त पत्रकारितेच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रेस क्‍लबचे मन्सूर शेख यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)