बालचमूंनी दिला चिऊ ताईला वाचवण्याचा संदेश

चिंचवड – चिऊताईचे बडबड गीत लहानपणी सर्वांनीच ऐकले आहे. पण आज चिऊताईच शहरात पहायला मिळत नाही. चिऊताईला दाणा, पाणी कोणीही घालत नाही. “चाऊताई दाणा खा’ हे आता बडबडगीतच राहिले आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनाची साक्षीदार असलेल्या चिऊताईला वाचवा, असा संदेश कागदाची घरटी बनवून, चित्र रंगवून चिमुकल्यांनी दिला.

चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्कमध्ये जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मुलांसह पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. सुरवातीला चित्रकला स्पर्धा झाली. या वेळी “सेव्ह मी’ हा लघुपट दाखविण्यात आला. पक्षी मित्र संतोष धाकपाडे यांचे व्याख्यान झाले. घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मितीबाबत कार्यशाळा घेण्यात आली. परिषदेचे चंद्रशेखर होळीकर, अपर्णा दाते, सायन्स पार्कचे सुनील पाटे, प्रशांत अलिबागकर उपस्थित होते.

मुलांना चित्रकलेचे साहित्य देऊन झाडाखाली बसविले. माझ्या संकल्पनेतील वसुंधरा, स्वच्छ व सुंदर पिंपरी चिंचवड आणि पवना नदी जलप्रदूषण यापैकी एका विषयावर चित्र काढण्यास सांगितले. मुलांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन चित्रे रंगवली. जल, वायु आणि ध्वनी प्रदुषणासह मानवनिर्मिती समस्या व त्यांचा जीवसृष्टीवर होणार परिणाम अधोरेखित करण्यात आला.

कागद व पुठ्ठ्याच्या पाइपांपासून चिमणीवर्गीय पक्ष्यासांठी घरटी कशी बनवायची, याचे प्रात्याक्षिकांसह मार्गदर्शन पक्षी मित्र संतोष धाकपाडे यांनी केले. ते म्हणाले, अन्नाची व्यवस्था केल्यास पक्षी आळशी बनतात. अन्न ते स्वत मिळवतात. आपण केवळ पाण्याची व्यवस्था करावी कावळे घार यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी चिमणीसारख्या छोट्या पक्षांची घरटी झाडाच्या खालच्या बाजूला, कमी उंचीवर वा इमारतीच्या खिडक्‍या पाइप अशा ठिकाणी असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)