बालकल्याणमध्ये गुरू पौर्णिमा उत्साहात

उरुळी कांचन- पूर्वी जंगलात आणि आश्रमात जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते; परंतु आता काळानुसार शिक्षण पद्धती बदलत आहे, त्यामुळे विधार्थ्यांना आपल्या गावात किंवा शहरात शिक्षण मिळत आहे. शिक्षकांनीही अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना द्यावी आणि विद्यार्थ्यांनी देखील आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी आणि समाज सुधारण्यासाठी करावा, असे मत बालकल्याण संस्थेच्या व्यवस्थापिका लीना पानसे यांनी केले.
बालकल्याण संस्थेच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी मुकबधिर आणि मतिमंद विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गीताराम दराडे, आनंद थत्ते, दत्तात्रय भावे, अमोल जोगळे, चंद्रकांत नवले, अशोक नांगरे यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय भावे यांनी आभार मानले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)