बारावीनंतर करियरची निवड करताना… (भाग एक)

बारावीनंतर काय करायचं, हा प्रश्‍न आता असंख्य करिअरपर्यायांमुळं गुंतागुंतीचा झाला आहे. उपलब्ध पर्यायांपैकी नेमकी कोणत्या कोर्सची निवड करायची याचे सर्वात मोठे आव्हान आज विद्यार्थ्यांसमोर आहे. या गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्‍त सल्ला !

योग्य मार्गदर्शनानंतरच घ्या प्रवेश – तज्ज्ञांच्या मते 12 वीच्या परिक्षांनंतरच करिअरसंबंधी अधिकांश मार्ग खुले होतात. मात्र, अनेकदा विद्यार्थांमध्ये जागरुकता नसल्याने त्यांना विविध अभ्यासक्रम किंवा संस्थांबाबत योग्य माहिती नसते. त्यामुळे एखाद्या कोर्समध्ये किंवा संस्थेत प्रवेश करताना योग्य माहिती आणि जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन मगच निर्णय घ्या.

पालकांची भूमिका – बारावी झाल्यानंतर अनेक मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याने एखाद्या चांगल्या संस्थेत अथवा त्याला आवड असलेल्या कोर्सची निवड करुन आपले करियर यशस्वी करण्याची इच्छा असते. यासाठी पालक जीवाचे रान करतात. काही वेळा असे करणे विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे असते. मात्र, अशा प्रकारे वागण्याचा काही मुलांवर दबाव येण्याचीदेखील शक्‍यता असते. अनेकदा विद्यार्थ्यांच्या मनात अशी भावना निर्माण होते की, एखाद्या कोर्ससाठी पालक आपल्यावर जबरस्ती करत आहेत. यामुळे त्यांचा रस्ता भरकटण्याची स्थिती निर्माण होते. तर अनेक जण घरच्यांसाठी त्या कोर्सला प्रवेश घेतात. त्यामुळे मुलांच्या आवडीनुसार त्याला कोर्ससाठी प्रवेश घेण्याची मुभा पालकांनी मुलांना दिली पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आवड आणि निवड – ज्या गोष्टी करण्यामध्ये आपल्याला आवड नाही अशा गोष्टी केल्यास अंतिमतः हातात काहीच शिल्लक राहत नाही. एखाद्या कोर्सची निवड करतानाही असेच आहे. जर एखाद्या कोर्सला प्रवेश घेतला आणि त्या विषयात तुम्हाला आवड नसल्यास तुम्ही त्यात योग्य कामगिरी करु शकणार नाही. त्यामुळे कोणत्याही कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वा आपल्याला त्यात किती आवड आहे याचे परिक्षण करावे. यानंतर प्रवेश घ्यायचा की नाही हे निश्‍चित करावे. यावरच तुमचे करिअर अवलंबून असते.

सल्लागारांचे मार्गदर्शन घ्या – कोणत्याही कोर्ससाठी प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी तज्ञ सल्लागारांशी चर्चा करणे आवश्‍यक आहे. असे केल्याने विद्यार्थ्यांना संबंधित कोर्स केल्यानंतरचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी समजण्यास मदत होते. अनेकदा याठिकाणी काउंसलरच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा एखादा पार्यय सुचवू शकतात. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी काउंसिलिंग करणे महत्वाचे ठरते.

– कॅ. नीलेश गायकवाड 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)