बारावीनंतर करियरची निवड करताना… (भाग दोन )

बारावीनंतर काय करायचं, हा प्रश्‍न आता असंख्य करिअरपर्यायांमुळं गुंतागुंतीचा झाला आहे. उपलब्ध पर्यायांपैकी नेमकी कोणत्या कोर्सची निवड करायची याचे सर्वात मोठे आव्हान आज विद्यार्थ्यांसमोर आहे. या गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्‍त सल्ला !

 पारंपरिक कोर्सची क्रेज – पारंपरिक अभ्यासक्रमात वेळोवेळी आवश्‍यक असणार बदल करुन त्याबाबत विद्यार्थ्यांना त्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न अनेकदा करण्यात आला. यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमात बदल होऊन विद्यार्थ्यांना त्या संबंधी संपूर्ण माहिती मिळण्यास मदत झाली. त्यामुळे आजही पारपरिक कोर्सला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या कोर्सेसला तीन श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते.

कला वर्ग –  सध्या अनेक तांत्रिक कोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र तरीही अनेक विद्यार्थ्यांची आर्टस विषयासंबधीची रुची अजिबात कमी झालेली नाही. कला विषयातंर्गत अनेक विषयांचा समावेश असून त्यातून विद्यार्थी नेमकी कशाची निवड करतो यावर पुढील सर्व गोष्टी अवलंबून आहेत. इतिहास, भूगोल, समाज शास्त्र या विषयांशिवाय मानसिक शास्त्र आणि राजकारणशास्त्र या विषयांकडे विद्यार्थ्यांना कल अधिक वाढल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विज्ञान शाखा – विज्ञान शाखेतून पी.सी. एम विषय घेतलेल्या विद्यार्थांना इंजिनिअरिंग करण्याची इच्छा असते. त्यात जर तो विद्यार्थी थोडा कल्पनाशील असेल तर तो पी.सी.एम सोबत आर्किटेक्‍ट, फॅशऩ टेक्‍नॉलॉजी आदी पर्याय निवडू शकतो. साहसी स्वभाव असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मर्चंट नेव्ही, एअर फोर्स, डिफेन्स किंवा नेव्हीमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. गणित विषयाबद्दल अधिक चांगली माहिती असेल तर बी. एससी करता येऊ शकते. याशिवाय बायोलॉजी विषय घेतलेले विद्यार्थी एम.बी.बी. एस, बीडीएस, फार्ससी आदीमध्ये करिअर करु शकतात.

कॉमर्स शाखा – या शाखेत प्रवेश घेणारे विद्यार्थी बी.कॉम, इकोनॉमिक्‍स, सी.ए, सी.एस यासारख्या विषयांचा अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय अनेक क्षेत्रांमध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे.

व्होकेशनल कोर्स – ऑफिस मॅनेजमेंट, मटेरिअल मॅनेजमेंट, जाहिरात, फूड प्रोसेसिंग, टूरिज्म अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट आदी व्होकेश्‍नल कोर्सेस विविध महाविद्यालयांमार्फत शिकविले जातात. हे कोर्स कमी कालावधीचे असल्याने तसेच शुल्क कमी असल्याने अनेकांना याला प्रवेश घेणे सोयीचे जाते. मोठ्या शहरांमध्ये तर अनेक जण बढती आणि अतिरिक्त पदवीसाठी या कोर्सेसला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

ऑफ बीट कोर्सचा ट्रेंड – रेडिओ जॉकी, मसाज किंवा स्पा थेरपी, टॅटू मेकिंग, गेमिंग, टूरिस्ट गाईड, शेफ आदी क्षेत्रामध्येदेखील तुम्ही प्रवेश घेऊ शकता.

– कॅ. नीलेश गायकवाड 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)