बारामती प्रांत विभागाच उरफाट्या कारभार सिद्ध

संग्रहित छायाचित्र

बारामती- बारामती येथील जनहित प्रतिष्ठान या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या जागेवर प्रांत कार्यालयाने केलेल्या अतिक्रमणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर व ही जागा संस्थेच्याच मालकीची आहे हे कागदपत्रावरून सिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू असलेले काम बंद करण्यात आले आहे. या जागेवरील असलेली सर्व बांधकाम मशिनरी परत नेण्यात आली आहे. त्यामुळे प्रांत कार्यालयाला चांगलाच धक्‍का बसला आहे. मनमानीपणाने प्रांत कार्यालयाचा चाललेला कारभार या निमित्ताने उघडकीस आला असून या प्रकारांना या घटनेमुळे चाप बसणा असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
बारामती शहरातील गट क्र. 16/3 प्लॉट नं 74 हा 3400 मीटरचा बिनशेती असून यावर जनहित प्रतिष्ठानच्या शाळेच्या मुला-मुलींसाठी व नागरिकांसाठी क्रिडांगण आहे. या क्रिडांगणाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून देखील प्रांत कार्यालयाने कोणतीही सूचना न देता व कोणतीही परवानगी न घेता या जागेवर सार्वजनिक टॅंक बांधायला सुरूवात केली. संस्थाचालक किशोर कानिटकर यांनी त्वरीत सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रांत कार्यालयांना पत्र देवून हे बांधकाम बेकायदेशीर स्वरूपाचे आहे, असे कळविले. तरीही प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी ही जागा तुमची नाही ती सरकारी मालकीची आहे, त्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही याउलट सरकारी कामात अडथळे आणता म्हणून गुन्हे दाखल करू असेही सुनावले होते.
या प्रकरणामुळे प्रांत कार्यालय चांगलेच अडचणीत सापडले. यानंतर वस्तूस्थिती दाखवून दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने स्वत:हून हे काम थांबवले. एवढेच नव्हे तर कागदपत्रांची तपासणी केली. या तपासणीत ही जागा जनहित प्रतिष्ठानला कायदेशीररित्या मिळालेली असून धर्मादाय आयुक्‍तांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करून या जागेची नोंदही केलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने काम थांबविले, त्यामुळे प्रांत कार्यालयाच्या उरफट्या कारभाराची तालुक्‍यात चांगलीच चर्चा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)