बारामती तालुक्यात विरोधी पक्षात शिजतेय छुपी रणनिती !

प्रमोद ठोंबरे

बारामती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी जोमात असताना बारामतीतील राष्ट्रवादी विरोधक आगामी निवडणुकीची रणनिती आखत असले तरी त्यांच्या गोटात शांतता असल्याने आगामी निवणुकीसाठी राजकीय वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, असा भास होत आहे. तर विरोधी पक्षांमध्ये छुपी रणनिती शिजत असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकील्ला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालेकील्ला असला तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विकासकामांच्या माध्यमातून मतदार संघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राष्ट्रवादीचे सातत्याने प्रयत्न आहेत. सातत्याने मतदारांच्या संपर्कात असल्याने निवडणुकांच्यावेळी शेवटची एक सभा घेऊन विजय संपादन करण्याची कला राष्ट्रवादीला अवगत आहे. बालेकील्ला असताना देखील राष्ट्रवादीचे नेते बारामती विधानसभा मतदार संघातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तर विरोधक शांत असल्याने राजकीय गोटात काही तरी शिजत असल्याचा वास येत आहे.

गतवर्षीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार व भाजपचे बाळासाहेब गावडे यांच्यात लढत झाली. शिवसेना तसेच कॉंग्रेसच्या वतीने देखील उमेदवार देण्यात आले होते मात्र, त्यांना मिळालेल्या मतांची संख्या नगण्य होती. भाजपला देखील एक लाखांचा आकडा त्यावेळी गठता आला नाही. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्‍याची परंपरा पवार यांनी कायम ठेवली. बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी किमान दोन वर्षांची तयारी अपेक्षीत आहे. सध्यस्थितीत भाजपच्या हालचाली मंदावल्याचे चित्र आहे.

भाजपचे प्रदेशउपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांचे बारामती तालुक्‍यात वलय आहे. ज्येष्ठ सहाकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे, माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे यांचा माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून जनतेशी संपर्क आहे. तर पुणे कृषी उत्पन्न बाजर समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी जिरायत भागात आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. तर पुणे जिल्ह्याचे माजी सरचिटणीस अविनाश मोटे यांच्या नावालादेखील तेवढेच महत्त्व आहे. असे असताना देखील भाजपच्या हालचाली का मंदावल्या आहेत? तर अनेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. मात्र, पक्षाकडून बारामती विधानसभेसाठी कोणतेही पाठबळ मिळत नसल्याने सध्यातरी या नेतेमंडळींसह राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांनी शांत राहाणेच पसंत केले आहे. त्यामुळे सध्यातरी तालुक्‍यात राष्ट्रवादीच जोमात असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)