बारामती खड्ड्यांत

  • नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जडली पाठदुखी
  • रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते म्हणण्याची वेळ

जळोची – बारामती शहर हे सर्वांगिण विकसित शहर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध विकास कामे झाली आहेत; परंतु असे असले तरी, पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांवरुन जाताना बारामतीकरांची मान-पाठ एक झाली आहे. शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचेही नियोजन केले नसल्याने दिवसेंदिवस समस्या वाढत आहे, त्यामुळे बारामती शहर खड्ड्यांत हरवले असल्याची खंत नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.
शहराच्या अंतर्गत व बाह्य भागात रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. यामुळे वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीरणांमुळे शहरात होत असलेली प्रचंड वाहतूककोंडी कमी झाली आहे; परंतु शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पुनावाला गार्डन रोड अद्याप ही करण्यात आला नाही. या रस्त्यामधून अनेक शाळकरी मुले, मुली ये-जा करीत असतात. सतत या रस्त्यावरती छोटे-मोठे अपघात घडत असतात मात्र, याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले होते. मात्र, ते नावालाच बुजवले असल्याचे दिसून आले. यामुळे अनेकांना पाठीचे दुखणे जडले आहे. शहराच्या बाजारपेठेसह अन्य प्रमुख रस्त्यांची अवस्था जवळपास सारखीच आहे. खराब झालेल्या रस्त्यांची पावसाळ्यात चाळण झाली आहे. पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांवरुन जाताना बारामतीकरांची मान-पाठ एक झाली आहे. नगरपालिकेने खड्डेमय रस्त्यांची डागडुजी करण्याचेही नियोजन केले नसल्याने दिवसेंदिवस समस्या वाढतच आहे. शहरातील इतर रस्ते तयार करण्यासाठीही अडचणी आहेत, पण किमान डागडूजी करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र, केवळ दिरंगाई करुन पावसाळ्यात खड्डे देखील बूजवले जात नाहीत. यामुळे अनेकांना पाठीचे दुखणे जडले आहे.

  • पावसाळ्यात दुर्लक्ष
    खड्डे बुजवण्यापूर्वी लहान-मोठे दगड टाकून पुन्हा डांबराचा किंवा मुरुमाचा थर टाकणे तसेच रोलरने दबाई केल्यास मुरुम वाहून जाणार नाही. या मुरुमावर खच किंवा खडी टाकून प्रश्‍न सोडवता येईल. मात्र, नगरपालिका जबाबदारी टाळत आहे. पावसाळ्यापूर्वी पालिकेने खड्डे बुजवले नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतरही दुर्लक्ष कायम आहे.

टेंडर निघाले आहे. लवकरच रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम सुरु आहे. अनेक भागात कामे झाली आहेत. उर्वरित खड्डे लवकरच बुजविण्यात येतील.
– पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बारामती नगरपालिका

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)