बारामतीत 63 ठिकाणी तिसरा डोळा

  • शहरात 172 सीसीटीव्हींची नजर : प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी

जळोची – शहराच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस विभागाने सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची मागणी केल्यामुळे नगरपालिकेच्या हद्दीत 63 ठिकाणी 172 कॅमेरे बसविण्याचा निर्णय बारामती नगरपालिकेने घेतला आहे. या प्रकल्पाला नुकतीच तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे बारामती शहराची सुरक्षिततेकडे वाटचाल होणार असल्याचे स्पष्ट झाले.
बारामतीत महत्त्वाच्या 63 ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. बसविण्यात येणारे सर्व कॅमेरे अत्यंत आधुनिक असून त्यामुळे शहराची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. वाढती गुन्हेगारी, धुमस्टाईल चोऱ्या, घरफोड्या, वर्दळीच्या ठिकाणी होणारी छेडछाड यासह धार्मिक स्थळांवर घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कॅमेरे गरजेचे होते. शहरात विविध शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्‍लासेस परिसरात विद्यार्थिनींचा पाठलाग करून छेड काढण्याचे प्रकार अधिक वाढले आहे. त्यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस व नगरपालिकेने संयुक्तरीत्या सर्वे करून स्थान व संख्या निश्‍चित करण्यात आली. संपूर्ण शहर व एमआयडीसी परिसरातही 172 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 4 मेगा पिक्‍सल कॅमेरे असून 154 पी.टी.झेड, व्हर्टिकल व 18 बुलेट कॅमेरे बसविण्यात येणार आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासन भवन व बारामती शहर पोलीस ठाणे अशा दोन ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. या नियंत्रण कक्षात 20x 40 व 16 इंची एलसीडी स्क्रीन बसविण्यात येणार आहे. या पूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे एक कोटी 25 लाख रुपये खर्च येणार आहे. यामध्ये राज्यसभेचे खासदार डी. पी. त्रिपाठी यांच्या खासदार निधीतून 75 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती नगरसेवक किरण गुजर यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)