बारामतीत वृक्षांविना कागदोपत्री बहरले गार्डन

33 लाखांच्या अंदाजपत्रकात लॉन व वृक्ष लागवडीची तरतूदच नाही

जळोची – गार्डन म्हणजे शहरातील नागरिकांना निसर्ग आणि पर्यावरण यांच्यासोबत जोडणारा धागा. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. असे असताना मात्र बारामती नगरपरिषदेने 33 लाख खर्च करून उंच भिंती बांधून वृक्षांविना गार्डन कागदोपत्री फुलवली आहे.

शहरात रस्ते दुरूस्ती, रस्तेरुंदी, उंच-उंच इमारतीचे बांधकाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. पूर्वीपेक्षा उष्णतेचा पारा वाढलेला आहे. बारामती शहरात अनेकवेळा तापमान 45 अंशा पेक्षा अधिक पोहोचले आहे. म्हणून विकासाच्या योजना आखताना व शहरीकरण करताना मूलभूत सुविधांकडे,पर्यावरण रक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून राखीव भूखंडावर गार्डन विकसित करण्यात येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती नगरपरिषदेने जिल्हा नियोजन कडील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेतर्गत 80 टक्के अनुदान म्हणजे 26.70 लक्ष व 20 टक्के म्हणजे 6.67 लक्ष नगरपरिषदेच्या नफा निधीतून देऊन चार वर्षापूर्वी राजमाता अहिल्यादेवी उद्यान उभारण्यात आले. यामध्ये फक्त वॉल कंपाऊंड, पथवे, कारंजे हौद, ग्रील वर्क अशी कामे करण्यात आली. मात्र या गार्डनला आजही वृक्ष लागवडीची प्रतीक्षा असल्याचे नकुतेच सर्वेक्षणात समोर आले.

गार्डन विकसित करताना यामध्ये जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मदत झाली पाहिजे याचा विसर बारामती नगरपरिषद सल्लगार अभियंत्यांना पडला असल्याने त्यांनी 33 लाखाच्या अंदाजपत्रकात लॉन व वृक्ष लागवडीची तरतूद केली नसल्याचा अजब कारभार समोर आला आहे. सल्लगार अभियंत्यांना राजकीय वरदहस्त असल्याने नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपरिषदेच्या अभियंत्यांनी बघ्याची भूमिका घेत हस्तक्षेप करणे टाळले असल्याचे सर्वांनी स्पष्ट केले.

5.42 लाखांची निविदा मंजूर…
लॉन करण्यासाठी 2.80 लक्ष व बोरवेल, मोटर, वीज कनेक्‍शनसाठी 2.62 लक्ष रुपयांची नुकतीच निविदा मंजूर करण्यात आली आहे. वृक्षारोपण,विद्युतीकरण, सिमेंट बाक 10, व कारंजे शुशोभिकरण करण्यासाठी स्थायी समितीची मान्यता घेण्यात आली आहे.

तीन फुट वॉल कंपाउंड हे पूर्वीचे होते. शासकीय निधी शिल्लक असल्याने हे काम केले. दुसऱ्या टप्प्यात लॉन व वृक्ष लागवडीचे काम करणार होते. हे सर्व कामे एकत्र घेतल्याचे अंदाजपत्रकात वाढ झाल्याने ही कामे नंतर घेण्यात आली.
– जयंत किकले, सल्लगार अभियंता, बारामती नगरपरिषद


शासकीय निधीतून उत्तम बाग झाली असती. नगरपालिकेच्या नफा फंडावर बोजा पडला नसता. नगरसेवक, अभियंत्याच्या ही बाब लक्षात न येणे यासारखे दुर्भाग्य नाही.
– संदीप देसाई, नागरिक, बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)