बारामतीत ज्येष्ठांची मोफत दाढी कटिंग

बारामती- वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे केस व दाढी कटींग आज मोफत करण्याचा उपक्रम अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्यनगरी बारामती येथे सलूनचा व्यवसाय करणारे आकाश पगारे यांनी राबविला.
तांदुळवाडी येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची सेवा करण्याचा व त्यांची सुश्रुषा करण्याचा उद्देशही असल्याचे पगारे यांनी सांगितले. या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद पाहता भविष्यातही महिन्यातून एक वेळ या पद्धतीने हा उपक्रम राबविणार असल्याचे पगारे यांनी स्पष्ट केले. यानिमिताने युवकाने केलेल्या या उपक्रमाचे आश्रमातील ज्येष्ठांनी कौतुक केले आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी कपील वेरूळे, रोहित गोफणे, वैभव रणपिसे व सत्यम पवार यांनीही सहकार्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)