बारामतीतील वॉर्ड क्र. 5 मध्ये पोटनिवडणूक

नगरपालिकेवर वर्णी लागण्याकरिता इच्छुकांची मांदियाळी

बारामती- राज्यातील सर्वाधिक अग्रेसर असलेल्या नगरपालिकांमध्ये बारातमी पालिकेचा समावेश होत असल्याने येथील निवडणुकही प्रतिष्ठेची असते. यामुळेच येथील वॉर्ड क्र.5 करिता लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी वाढत असून योग्य त्या उमेदवारालाच संधी देण्याचा प्रयत्न माजी उपमख्यमंत्री तथा आमदार अजित पवार करणार आहेत.

बारामती नगरपरिषदेच्या कारभाराचा पॅटर्न राज्यातच नव्हे तर देशात चर्चीला जात असल्याने या ठिकाणी नगरसेवक पदावर निवडणूक येण्याकरिता अनेकांची इच्छा असते. यातूनच ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीचीही होत असते. बारामती शहरात वॉर्ड संख्या 18 असून त्यानुसार 44 नगरसेवक सदस्य संख्या असलेली ही नगरपरिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीचे 38 नगरसेवक तर विरोधी गटाचे 2 नगरसेवक आहेत. स्विकृत 4 नगरसेवक आहेत. यातील वॉर्ड क्र. 5 मधील नगरसेवक बाळासाहेब सातव यांचे ह्दयविकाराने निधन झाल्याने या जागेकरिता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर वॉर्ड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असल्याने येथे राष्ट्रवादीचाचा नगरसेवक निवडून येण्याकरिता अजित पवार यांचे प्रयत्न असणार आहेत. यामुळेच या पोटनिवडणुकीकरिता राष्ट्रवादीतील अनेक जण इच्छुक असून यातील योग्य त्या उमेदवारालाच संधी देण्याबाबत पवार आग्रही असणार आहेत. गेल्यावेळी वॉर्ड क्र. 2 मधून विजयाचे दावेदार असलेले मंगेश मधुकर ओमासे यांनी पवार यांच्या आदेशानुसार अर्ज माघारी घेतला होता. त्यामुळे त्यांची नगरसेवक पदाची संधी हुकली होती. यामुळे वॉर्ड क्र. 5 मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकरिता मंगेश ओमासे हे दावेदार मानले जात आहेत. याच ठिकाणाहून अन्य उमेदवारांनीही निवडणुकीची तयारी दर्शविली आहे. मात्र, सामाजिक कामांतील सहभाग तसेच पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून काम करणारा कार्यकर्ता म्हणून आमासे यांची पक्षात प्रतिमा आहे. यामुळेच पवार जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल, असेही सांगण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.