बारामतीतील दुष्काळाची पवार उद्या करणार पाहणी

बारामती- बारामती तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न देखील ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्याचे आयोजन केले आहे. बुधवारी (दि. 5) जिरायती भागातील गावांना राष्ट्रवादीचे नेते भेट देणार आहेत. तसेच सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.

बारामती तालुक्‍यातील जिरायती भागात दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. त्यास भेट देणार आहेत. तसेच वढाणे गावातील दुष्काळाची पाहणी देखील ते करणार आहेत. दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय योजना करण्याच्या प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच विविध प्रश्‍नांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार असल्याचे होळकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.