बारामतीतील घरगुती खानावळीत सिलिंडर स्फोट

बारामती- येथील विद्या प्रतिष्ठान जवळ असलेल्या ग्रीन पार्क शेजारील घरगुती खानावळीत रविवारी (दि. 5) सकाळी आठच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होवून आग लागली. या स्फोटामुळे पत्र्याचे छत उडाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेते आग आटोक्‍यात आणली. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने वीजपुरवठा बंद करून अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत एका बांधकामाच्या ठिकाणी असलेला पाण्याचा टॅंकर आणत आग विझविण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे अन्यत्र आग पसरली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.